मकर संक्रांतपौष महिन्यातील ‘मकर संक्रांत’ हा निसर्गाचा सण असून त्यास भौगोलिकदेखील बरेच महत्त्व आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो.
पृथ्वी स्वत:भोवती एका दिवसात प्रदक्षिणा पुरी करीत असतानाच सूर्याभोवती ३६५ दिवसांत प्रदक्षिणा पुरी करीत असते. एका वर्षात सूर्याची ‘बारा’ संक्रमणे होतात. त्यापैकी मकर व कर्क ही दोन महत्त्वाची आहेत. सूर्याच्या गतीची १२ स्थाने मानली जातात. त्यास ‘राशी’ म्हणतात. दहाव्या म्हणजे ‘मकर’ राशीत सूर्य जातो त्यास ‘मकर संक्रमण’ म्हणतात. आषाढातील कर्क संक्रमणात दक्षिणायन म्हणतात, तर उत्तरायणाच्या प्रारंभी सूर्य उत्तरेकडे वळत असल्याने दिवस हळूहळू मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते...........
वरदाई मानाईच्या नावानं चांगभलएका बाजूला डोंगर, दुसर्या बाजूला कापशी नदी यामध्ये विसावलेले दहिवली हे गाव! श्री वरदाई मानाई या गावाचे पूज्य देवस्थान आहे भक्तांना वर देणारी, त्यांना मार्ग दाखविणारी म्हणून वरदाई मानाई दर तीन वर्षांनी येणार्या पौष पौर्णिमेनिमित्त याठिकाणी यात्रा भरविली जाते यंदा हा देवीचा त्रैवार्षिक समायात्रा महोत्सव १७ ते १९ जानेवारी दरम्यान चालणार आहे ढोल, वाजंत्री, सनई आणि घंटांच्या निनादात संपूर्ण मंदिर परिसरातील वातावरण ‘वरदाई मानाईच्या नावानं चांगभलं’ च्या घोषाने दुमदुमून जाणार आहे .............
लाट फिरवणेतीन दिवसांच्या या समायात्रा महोत्सवात अतिशय महत्त्वाचा व थरारक प्रकार म्हणजे लाट फिरवणे यात ५० फुटांपेक्षा जास्त उंचीचे सरळ झाड तोडून व सोलून त्याची लाट बनविली जाते ती लाट गावागावातून नाचत आणि सुवासिनींच्या पंचारतीची ओवाळणी स्वीकारत देवीच्या मंदिरासमोरील २५ फूट उंचीच्या लाकडी खांबावर तोलून बगाडाच्या खोबणीत बसविली जाते लाटेच्या दोन्ही टोकांना मजबूत दोरखंड बांधून पौर्णिमेच्या दिवशी मानकर्यानंतर इच्छुक भक्तांना दोरखंडावर चढवले जाते भक्ताला खांबाभोवती गोलाकार फिरवले जाते
तीर्थाटन
तुंगारेश्वरठाणे जिल्ह्यातील वसईरोड येथील तुंगार डोंगरावर तुंगारेश्वर हे शिवाचे मंदिर वसलेले आहे तुंगार डोंगराच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या रांगात सुमारे सातशे फूट उंचीवर हे भव्य मंदिर आहे मंदिराचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे आजूबाजूचा परिसर पाहण्यासारखा आहे तुंगारेश्वराची स्थापना परशुरामाच्या काळात झाली असे म्हटले जाते.............

तुकयाची ग्वाहीलहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ।
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।
हा तुकारामाचा खूपच प्रसिद्ध असा अभंग असून वारकरी संप्रदायाची जी महत्त्वाची खूण आहे ‘नम्रता’ त्यासंबंधी हा आहे. आपण आपले म्हणणे सांगावे व ते लोकांनी ऐकावे असा सरळ प्रपंच असत नाही. लोकांना तो सहजी पटावा म्हणून उदाहरण द्यावे लागते. यालाच व्याकरणात ‘दृष्टांत’ असे म्हणतात. हा भाषेचा अलंकार आहे.............
धर्मशिक्षणमकर संक्रांतीच्या काळात दान आणि वाण का देतात?या काळात दान आणि वाण दिल्याने जिवाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. या काळात दान दिल्याने ते सत्कारणी लागते.
मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?काळ्या रंगात तमोगुण जास्त प्रमाणात ग्रहण केला जातो, तरीही या काळात धर्माने काळे वस्त्र परिधान करण्याची अनुमती दिली आहे कारण या काळात रज-सत्व कणांचे प्राबल्य असल्याने त्याचा जिवावर अनिष्ट परिणाम होत नाही............
ग्रामदैवत
चंडिका देवीमुक्काम : आयनोली पोस्ट ः कोळथरे
तालुका : दापोली, जिल्हा : रत्नागिरी
प्रेषक : आयनोली गोमरइ ग्राम विकास मंडळ
नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबईत स्थायिक झालेले असले तरी मन मात्र नेहमी ‘ग्रामदेवते’चा धावा करीत असते. आपल्या ग्रामदेवतेचा फोटो दै. ‘सामना’च्या शेवटच्या पानावरून प्रसिद्ध करू शकता. ग्रामदेवतेचा फोटो पाठविण्यासाठी आमचा पत्ता : सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.